राधानगरी-कोल्हापूर, एक निसर्गरम्य अनुभव

हिरवा निसर्ग हा भवतीने । जीवन सफर करा मस्तीने ||
मन सरगम छेड़ा रे, जीवनाचे गीत गारे। गीत गारे धुंद व्हारे ॥

मराठी गाण्याचे हे बोल नुसते देखील कानावर  आले तरी किती सुखवुन जातात. मुळातच निसर्ग या शब्दामधे किती आनंद आणि सुंदरता आहे हे वेगळे सांगायची गरज नाही, होय ना?
उन सावलीच्या खेळात राधानगरित स्वागत
निरोगी जंगलाचे द्योतक म्हणजे हे लाइकेन
Leafy Foliose Lichens 
स्वच्छ, सुंदर, पाना-फुलांनी बहरलेला, पक्षी-प्राणी यांची पावलो-पावली जाणीव करून देणारा, आल्हाददायक निसर्ग, शहरी लोकांना मिळणे जरा कठीणच पण त्याला अपवाद कोल्हापुर करांचा, त्याचे कारण राजश्री शाहू महाराजांनी शिकारी साठी राखून ठेवलेले हे वन जे आता दाजीपुर नावाने ओळखले जाते व  आता "राधानगरी अभयारण्य" म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या डोंगर रंगांमधील निम -सदाहरित प्रकारामधे मोडणारे या अभयारण्याचे वनक्षेत्र आहे. पश्चिम घाटातील सर्वाधिक सुंदर, पक्षी-प्राणी-फुले- किटक यांच्या विविधतेने नटलेला हा वनप्रदेश आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही.

कोल्हापुर पासुन  अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे ४५ कि.मी.वर हे ३५१.१६ चौरस कि.मी. (351.16 Sq. Km)  क्षेत्रफळाचे अभयारण्य स्थित आहे. कोल्हापुर स्टेशन पासून गाड़ी भाड्याने घेवून तुम्ही या ठिकाणी पोहचू शकता.निद्रिस्त स्वर्गीय नर्तक - Paradise Flycatcher
राहण्यासाठी वनविभागाची तंबू , डाक बंगला किंवा वसतिगृहाची सोय आहे तसेच दाजीपुर - राधानगरी रस्त्यावर काही बंगले आहेत जे भाड्याने मिळु शकतात.अश्याच एका  बंगल्यात आम्ही या वेळेस  राहिलो, बाजूलाच छान कोल्हापुरी जेवणाची सोय  होती. जिथे, म्हणजेच  "बायसन रेस्टॉरेंट" मधे आम्ही यथ्थेच्च जेवणाचा आनंद लुटला :) संध्याकाळी जंगलात फेरी मारली ती चक्क रात्र होइ पर्यंत , रात्री बेडकांच्या विशिष्ठ जाती पाहण्यासाठी बॅटरी घेवून जंगल पालथे घातले. एक बेडुक दिसला पण त्या भ्रमंतीचा सोनेरी क्षण म्हणजे "शांत झोपलेला स्वर्गीय नर्तक " जो आम्ही अगदी जवळून पाहिला :)


पुढे पहाटे उठून  आम्ही राधानगरी गाठले जेथे सावराई सड़ा, सांबर कोंड, लक्ष्मी तलाव, कोंकण  दर्शन, शिवगढ किल्ला अशी बरीचशी ठिकाणे  आहेत आणि नशीब चांगले असेल तर कुठल्या ना कुठल्या वन्य प्राण्याचे दर्शन नक्कीच होते. इथे गवा (रानरेडा ), रान कुत्रा, बिबळया, सांबर, भेकर,रानडुक्कर, साळींदर, ससे, लंगूर, शेकरू (मोठी खार) व कधी-कधी वाघ आणि हत्ती देखील दिसण्यात येवू शकतात.
लक्ष्मी तलाव
आता आमच्या नशिबात फ़क्त पयांचे ठसे होते, कारण तिथल्या एका सरकारी अधिकाऱ्याची पोरं खुप गोंगाट करत गाड़ी घेवून फिरत होती. असो…
गव्याचे ठसे - Wild Gaur / Bison Pug Marks
रान कुत्र्याचे ठसे - Wild Dog Pug Marks

राधानगरी मधे वनस्पति आणि फुले देखील तितकीच सुंदर आणि नानाविध आहेत. इथे असंख्य वनस्पती प्रजाति आहेत त्यातल्या बऱ्याच औषधि व दुर्मिळ देखील आहेत. काहि क्षणचित्रे
अंजनाची निळी फुले
अंजनाचा बहर
रस्त्या लगतची पिवळी फुले 
हळदी - कुंकु

तणतणी, घाणेरी
मिकी-माउस प्रजाती
माळरानावरची पिवळी फुले

डिंगळा / खुळखुळा


लाल पुंगळी Red Star Glory
घाटात बहरलेली एक वनस्पती
एक रानफुल


तेरड्याचा एक प्रकार
रान तंबाखू
रानफूल
घाटात फुललेल एक फुल
लक्ष्मी तलावालगतचे टवटवीत गवत
माळरानावरील एक फुल
मुंग्यांचे वारूळ
जंगली मुंग्याचे घर
मृत्यूचा सापळा
रान फळे
रान पेरू
गूंगी आणणारी रानफळे
आता फुले असतील आणि फुलपाखरे नाहीत असे कसे होईल? रंगबिरंगी फुलपाखरे नेहमीच काहिश्या लगबगीने उड़त असतात आणि त्यांना छायाचित्रात बंदिस्त करणे म्हणजे नाकी नऊ आलेच पाहिजे. काही  क्षणचित्रे - अथक परिश्रमातून मिळवलेली :P


Common Sailor
Chocolate Pansy/ Soldier
Common Crow
Common Gull
Common Five-Ring
Blue Tiger


Common Five-Ring
Lime Butterfly
शिशु - फुलपाखरु
तसा माला पक्षी निरीक्षणाचा छंद आहे, म्हणून आम्ही सुरवातीला रंकाळा दर्शन केले व शिशिर ऋतू मधे येणारे पाहुणे पाहिले आणि मग पुढे राधानगरीला रवाना झालो. काहि क्षणचित्रे रंकाळा आणि राधानागरीच्या पक्षी वैभवाची ………
शेकाट्या / पाणटिलवा - Black-Winged Stilt
डावी कडून उजवीकडे (L - R)
ठिपकेवाला तुतवार - Wood Sandpiper
तुतवार, तुतारी - Common Sandpiper

हिरवा सुरमा, हिरवा तुतवार, हिरवट पायाचा तुतवार - Common GreenShank
छोटी चिखली। तुतारी - Little Stint
शेकाट्या / पाणटिलवा - Black-Winged Stilt

तारवाली पाकोळी, तारवाली भिंगरी, काडीवाली भिंगरी - Wire-tailed Swallow
& माळभिंगरी - Barn Swallow
घार
Black Kite
नदी सुरय
Indian River Tern
दलदल ससाणां / हारिण
Marsh Harrier


वंचक/भूरा बगळा/कोक/ढ़ोकरी
Pond Heron
चांदवा / वारकरी 
Common Coot
प्रतिबिंब पाहणारा लहान बगळा
Little Egret
कंठेरी चिखल्या (मागे) - Little Ringed Plover &  तुतवार (पुढे)
प्लवा बदक, हळदी कुंकू, धनवर बाड्डा - Spot-billed Duck
चित्रबलाक, रंगीत करकोचा, चामढोक - Painted Stork
लालबुड्या बुलबुल
Red-Vented Bulbul

मलबारी मैना
Chestnut-Tailed Starling
शिपाई / नारद बुलबुल
Red-Whiskered Bulbul

कवड़ा झुड़पी गप्पीदास / कवड़ा गोजा- मादी-Pied  BushChat - Female
जंगल भाई / रानभाई /  जंगली सातबहिणी / केकाट्या - Jungle Babbler
कवड़ा झुड़पी गप्पीदास/कवड़ा गोजा- नर-Pied  BushChat-Male
सागरी/ब्राह्मणी घार
Brahminy Kite
तीसा / व्याध
White-Eyed Buzzard

शिक्रा
Shikra
चाष /  नीलपंख / तास
Indian Roller

नीलांग
Verditer Flycatcher

जांभळी पाणकोंबडी - Purple Moorhen
हिरवा वेडा-ऱाघु/बहिरा,रान,पाण पोपट
Green Bee Eater
शोधा कुठे लपला आहे
Vernal Hanging Parrot
कुर्टुक
White-cheeked Barbet
पांढरा धोबी
White Wagtail
निळा कस्तूर, नीलकस्तुरी
Blue Rock Thrush
छोट्या खंड्या
Common Kingfisher


मलबारचा तुरेवाला चंडोल
Mala
bar Lark
हळदी बुलबुल/पिवळ्या भुवईचा बुलबुल
Yellow-Browed Bulbul
तांबडया मानेचा भारिट
Red headed Bunting

जांभळा शिंजीर/जांभळा सूर्यपक्षी/ चुमका/फुलचुखी
Purple Sunbird
पायमोज वटवटया
Booted Warbler
गुलाबी चटक
Common Rosefinch
किटक :)

छोटा पाणकावळा
Little Cormorant
चतुर
Dragonfly
या सहलीची सांगता आम्ही कोल्हापूरच्या "ओपल" हॉटेल मधे तांबडा - पांढरा रस्सा खावून  केली. भूक लागली असल्याने छायाचित्रे काढली नाहीत :P
दाजीपुरच्या जंगलातून टिपलेला सूर्यास्त

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes