Posts

Showing posts from April, 2019

Bhavnagari Sabji aka Kande Ghati Bhaji

Image
ब्लॉगचे नाव वाचून थोडे विचित्र वाटले असेल ना? जीवन रक्षक भाजी ? आता हा काय प्रकार आहे ??? असे झाले असेल, हो की नाही ? गांगरून जायचे कारण नाही; हे जीवन रक्षण पुरुषांसाठी  आहे " So rest of the clan can chill"


तर जेवणाची आणीबाणी आणी पुरुष हे अतीसामान्य समीकरण आहे. लग्न झालेले असो किंवा नसो पुरुषांच्या आयुष्यात जेवण बनवायची आणिबाणी नेहमीच येते. मी देखील ह्या आणीबाणीला अपवाद नाही. तर झाले असे की ऑफिसच्या कामनिमित्त माला कुवैत देशात जाण्यास सांगितले, साधारण २००७ साल असावे. मी  नेहमीच्या प्रवासाच्या सवयीने सूखा-नाश्ता म्हणून गाठे, कुरमुरे काही मॅगीची १-२ पाकिटें बॅगेत ठेवली होती. प्रवास उत्तम झाला पण रात्री हॉटेलवर पोहोचण्यास उशीर झाला आणि मॅगीची पाकिटें त्याच रात्री संपली, असो..... दूसरा दिवस मजेत गेला, दुपारच्या जेवणाची सोय कंपनीने केली त्यामुळे काही त्रास झाला नाही. रात्रीच्या जेवणाची सोय माझी मलाच करायची होती. हॉटेल मधले जेवण महाग पड़ते म्हणून मी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. बाहेर पडताच एका गल्लीमधे खुप सारी हॉटेल्स दिसली, त्यातल्या त्यात एक छानसे हॉटेल बघून मी तिथे स्थिरावलो. …