Posts

Showing posts from July, 2018

गोष्ट एकादशीची

Image
लहानपणी एकादशी म्हंटली की साबुदाण्याची खिचडी, पेज किंवा वरीचा भात आणि शेंगदाण्याची चटणी एवढेच माहित होते. एकादशीचे उपवास आजी करायची त्यामुळे या पदार्थावर ताव मारण्यासाठी मी नेहमी हजर असायचो. आषाढी एकादशीच्या दिवशी आमची शाळा लवकर सुटली आणि मी आजीच्या घरी गेलो. घरात सुंदर भाजलेल्या शेंगदाण्याचा सुगंध येत होता मला कळून चुकले की आज उपवासाचे काही तरी खायला मिळणार 😋😋😋. साबुदाण्याच्या खिचडीचा बेत होता हे कळले. मी पाठीवरचे दप्तर बाजूला टाकले, आणि स्वयंपाकघरात जागा पकडून खिचडी तयार होण्याची वाट पाहू लागलो. आजी स्वयंपाक करण्यात मग्न होती आणि मी त्रास देण्यात 😈😈😈. माझा त्रास कमी व्हावा म्हणून आजीने मला विचारले एकादशीचा उपवास का करतात माहिती आहे काय? मी म्हंटले "नाही!" 😐😐😐. हे ऐकून आजी म्हणाली "शांत बस! मी तुला एकादशीची गोष्ट सांगते"....
आजी ने गोष्ट सांगायला सुरुवात केली ............................ " आपण आता कलियुगात जगतो आहोत. कलीयुगा पूर्वी सत्ययुग, त्रेतायुग, आणि द्वापारयुग होऊन गेली. सत्य युगात विष्णू देवाने ४ अवतार घेतले ते म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह आणि…

थाई - थै थैयाट

Image
आठवड्याची सुरुवात झाली आणि रोजचा दिनक्रम चालू झाला. सकाळी लवकर उठून ट्रॅफिकला चुकवून  ऑफिस आणि संध्याकाळी ट्रॅफिकमधे अडकून घरी. मित्रांसाठी वेळ म्हणजे व्हाट्सअँपवर दिवसभर येणारे संदेश (Messages), या ग्रुप मधून त्या ग्रुप मध्ये "कॉपी-पेस्ट". ऑफिस मधे रोजच्या कामात गुंग असताना भ्रमणध्वनी कंपित झाला (Cellphone Vibrate) आणि अमेरिकेच्या मित्राचा मेसेज आला "मी ऑफिस जवळ येत आहे, खाली भेट". २००७ ते २०१० या दरम्यान आम्ही अमेरिकेत एकत्र काम करायचो आणि भाड्याने खोली घेऊन एकत्र राहायचो. मित्र अमेरिकेतून इथे आला की एक भेट नक्कीच असते आणि सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो. त्या काळात बर्याच गमती-जमती केल्या. पण एक गोष्ट जी नेहमी स्मरणात राहिली, ती एका थाई हॉटेलमधल्या जेवणाची......  अमेरिकेत सुरुवातीला सगळेच नवीन त्यात बरेच लोकं गावात वाढलेले आणि शहरात नोकरीसाठी आलेले, मुद्दा असा कि शहराचा वारा न लागलेले. असो, तर गोष्ट सुरु होते अमेरिकेच्या एका छोट्या शहरात ती म्हणजे ग्रीनविल,साऊथ कॅरोलिना (Greenville ,SC, USA) येथे. आमच्या कंपनी मधून साधारण ८ ते १० लोक ग्रीनविल येथे कामानिमित्त पाठवण…