Posts

Showing posts from May, 2015

एक चित्तथरारक पाठलाग

Image
जुलै २०१०. खूप छान पाउस पडत होता. माझे गाव सफाळे अगदी नव्या नवरी सारखे हिरवा शालू नेसून पावसात चिंब-चिंब भिजत होते. सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मी देखील निवांत चहा पीत पावसाचा आनंद घेत होतो. तेवढ्यात मुंबईच्या एका मित्राचा फोन आला. 
मित्र: हेलो, कसा आहेस ? काय चालू आहे ?
मी: अरे मजेत आहे. तू बोल आज कशी काय आठवण काढलीस ?
मित्र: अरे विशेष असे काही नाही. बसलो आहे चिखल बघत !
मी: चिखल बघत ? अरे काय झाले ?  छान पाऊस पडतो आहे आणि चिखल काय बोलतोस? एवढा निराश का झाला आहेस? सगळे ठीक आहे ना?
मित्र: अरे काही नाही, गावची आठवण !!! पाउस म्हंटला कि खूप धमाल असायची गावाला. मुंबईत आलो आणि सगळा निसर्ग माझी वाट पाहत गावाकडेच  राहिला बघ :(
मी: अरे एवढेच ना ? तू पण ना , उगीच नौटंकी करतोस. गावची आठवण आली ना !!!  मी बघतो काय ते ! सोमवारी ऑफिसला भेटू.
मित्र: हा ठीक आहे, चल बाय. भेटू !!!

मी फोन ठेवला आणि मित्रांसाठी पावसाळी सहल आयोजित करण्याचा बेत आखला. सोमवारी ऑफिसमध्ये येताच माझ्या मित्रांना बेत सांगितला. सगळे एका मताने हो म्हणाले आणि पावसाळी सहलीचा आमचा बेत ठरला. माझे मुंबईचे सगळे मित्र शनिवारी रेल्वेने सफाळ्याला य…