Posts

Showing posts from March, 2015

बर्फातल्या आठवणी - स्की इन आप्लेशिअन मॉउंटन

Image
कयाकिंग करून बरेच महिने उलटले असतील, सर्व मित्रांची चुळबुळ सुरु झाली. सगळ्यांनाच आता एखाद्या मोठया सहलीचे वेध लागले होते. रोज इंटरनेटवर "Things  to  Do" शोधणे चालले होते. खूप डोकेफोड करून सगळे एका बेतावर स्थिरावले आणि १९ फेब्रुवारी २००९ साली मी आमच्या स्की (Ski) ट्रिपचा बेत अगदी खर्चासहित सगळ्यांना इमेल केला.
सगळे मित्र या सहलीच्या तयारीला लागले. या सहलीला मात्र सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. बेत आखल्या प्रमाणे ह्यूस्टन (Houston, TX, USA) या शहरातून माझे ४ मित्र माझ्या ग्रीनवील येथील निवासस्थानी येण्यास निघाले आणि माझ्या इथले ४ असे एकूण ८ लोक या सहलीसाठी सज्ज झालो. बेत आखल्या प्रमाणे सर्व लोक अटलांटा इथे भेटतील आणि तिथली काही ठिकाणे पाहून ग्रीनवीलला रात्री राहण्यासाठी येतील. ह्युस्टनची मंडळी अटलांटाला (Atlanta, GA, USA) आली आणि आमच्या सहलीला सुरुवात झाली. वातावरण थोडे ढगाळ होते पण फिरण्यासारखे होते, आम्ही अटलांटा येथील कोका-कोला कंपनीला सहलीची पहिली भेट दिली. तिथली खासियत म्हणजे जग भरात वितरीत होणारया जवळ जवळ ७० ते ८० प्रकारच्या कोकची तुम्ही चव घेऊ शकता. तिथले वस्तूसंग्रहा…

वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव !!!

Image
माझ्या गोष्टींच्या शीर्षकावरून मी कश्याबद्दल लिहिले आहे हे चटकन लक्ष्यात आले असेलच ? :) 
होय मी होड़ी चालवण्या बद्दलच बोलतो आहे. नेहमी प्रमाणेच मी
"दर्यावरी आमची डोले होरी , घेवून माशांच्या ढोलीन्‌ आम्ही हाव जातीचे कोली" हे गाणे ऐकत असताना माला माझ्या मित्रासोबत केलेली बोटिंग (नौका विहार ) आठवली आणि मी हसत सुटलो. माझ्या मंडळीना (बायकोला) मी का हसतो आहे हे कळता कळेना म्हणून ती इथे तिथे बघू लागली कुठे काही लागले आहे का म्हणून आणि ते पाहून मी अधीकच हसू लागलो. बायको जास्त रागावणार असे कळताच मी हसू आवरले आणि शांत झालो. मग बायकोने प्रामाणिक पणे विचारले का हसताय ? मग तिला गोष्ट सांगण्यापलीकडे माझ्याकडे पर्याय नव्हता.……… !!!
अमेरिकेत असताना प्रत्येक आठवड्याच्या सुट्टीत काही-ना-काही उद्योग करायचे,  सरळ मित्रांच्या भाषेत म्हणायचे तर  "किडे करायचे" असा आमचा नियम असायचा. अश्याच एका सुट्टीत आम्ही नौकाविहार (बोटिंग) करायला जावू असे ठरले. माझ्या कडे नियोजनाचा भार नेहमी प्रमाणे होताच आणि मी बोटिंगसाठी जागा शोधणे, तिकिटे काढणे ह्या मधे गुंग झालो. ठरवल्या प्रमाणे "HeadWaters Outfit…