Posts

Showing posts from February, 2015

एका अनोख्या सफरीच्या पाऊलखुणा ………!!!

Image
आज गाडीतून गावाकडे जात असताना लहान मुलांचा गोंगाट ऐकु आला..... विमा~न ! विमा~न ! विमा~न !
पाहिले तर सगळी मुले आकाशाकडे बघत सैरा-वैरा पळत होती आणि जोर जोरात ओरडत होती …… विमान! विमान!.
जणु  काही  ते विमान ह्यांच्या हाका ऐकून थांबणार आहे आणि अचानक माला माझे बालपण आठवले……"मी तरी वेगळे काय करायचो ? म्हणून मला माझेच हसु आले" :). बऱ्याच आठवणी दाटुन आल्या आणि कधी मी  त्यात बुडून गेलो माझे मलाच कळले नाही. अशीच एक गोड आठवण म्हणजे माझी पहिली हवाई सफर.

खरे सांगायचे तर या हवाई सफरीचे कागदी नियोजन (पेपर प्लानिंग ) खुप अगोदर झाले होते, ते कसे तोही एक मजेदार किस्सा आहे. तो असा की.......... 

२००३ साली माझे अभियांत्रिकी शिक्षण (इंजीनियरिंग) पूर्ण झाले आणि आमच्याच पदवी महाविद्यालयामधील उपकरणीकरण विभागात (इंस्ट्रूमेंटेशन डिपार्टमेंट) मी सहाय्यक शिक्षक (टीचिंग असिस्टंट) म्हणून रुजू झालो. तसे पाहायला गेले तर माझे महाविद्यालयिन जीवन थोड़े अजुन वाढले पण या वेळेला महाविद्यालयात जाण्याचे माला पैसे मिळणार होते एवढेच :P. माझ्या सर्व मित्रांनी पार्टी (मेजवानी)  साठी तगादा लावला आणि मी तो मान्य करून सर्व मित…