Posts

Showing posts from January, 2015

राधानगरी-कोल्हापूर, एक निसर्गरम्य अनुभव

Image
हिरवा निसर्ग हा भवतीने । जीवन सफर करा मस्तीने ||
मन सरगम छेड़ा रे, जीवनाचे गीत गारे। गीत गारे धुंद व्हारे ॥

मराठी गाण्याचे हे बोल नुसते देखील कानावर  आले तरी किती सुखवुन जातात. मुळातच निसर्ग या शब्दामधे किती आनंद आणि सुंदरता आहे हे वेगळे सांगायची गरज नाही, होय ना?
स्वच्छ, सुंदर, पाना-फुलांनी बहरलेला, पक्षी-प्राणी यांची पावलो-पावली जाणीव करून देणारा, आल्हाददायक निसर्ग, शहरी लोकांना मिळणे जरा कठीणच पण त्याला अपवाद कोल्हापुर करांचा, त्याचे कारण राजश्री शाहू महाराजांनी शिकारी साठी राखून ठेवलेले हे वन जे आता दाजीपुर नावाने ओळखले जाते व  आता "राधानगरी अभयारण्य" म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या डोंगर रंगांमधील निम -सदाहरित प्रकारामधे मोडणारे या अभयारण्याचे वनक्षेत्र आहे. पश्चिम घाटातील सर्वाधिक सुंदर, पक्षी-प्राणी-फुले- किटक यांच्या विविधतेने नटलेला हा वनप्रदेश आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही.
कोल्हापुर पासुन  अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे ४५ कि.मी.वर हे ३५१.१६ चौरस कि.मी. (351.16 Sq. Km)  क्षेत्रफळाचे अभयारण्य स्थित आहे. कोल्हापुर स्टेशन पासून गाड़ी भाड्याने घेवून तुम्ही या ठिकाणी पो…