गोमु माहेरला जाते हो नाखवा…………

गोमु माहेरला जाते हो नाखवा,
हिच्या घोवाला कोंकण दाखवा............

माझ्या सासरच्या लोकांनी ह्या गाण्याची जरा जास्तच दखल घेतली आहे हे नक्की कारण सुट्टी मिळाली रे मिळाली की आम्ही सगळे कोकणात असतो  :P असो................

तसा मुळचा मी कोकणातला, गावाचे नाव (कुंभारखाणी) अगदी तोंडपाठ पण जाण्याचा कधी योग आला नाही. खुपवेळा जाण्याचा बेत केला पण काही योग जुळून आला नाही. पुढे लग्न झाले (२७ डिसेंबर २०१२ ) आणि माझी कोंकण वारी चालू झाली. माझ्या मंडळींचे मुळ गाव सांगवे, जेव्हा ओळख झाली तेव्हा "आम्ही सांगव्याचे शेलार " अशीच झाली होती :P
मुळ गावापासून ५-६ किलोमीटरवर कोसुंब गावी आम्ही सगळे आता जावून  राहतो; जेथे माझ्या सासरेबुवानी छान बंगला बांधला आहे. लाल चिर्यांच्या भिंतीने वेढलेली आामराई आणि त्यामधे टुमदार असा बंगला........ऐकूनच छान वाटते ना ??

टुमदार "आपला" बंगला :)

कोकण खुप सुंदर आहे, निसर्गरम्य आहे, असे  आपण नेहमीच ऐकतो पण नक्की काय हे तेथे जावून पहिल्या शिवाय गत्यंतर नाही हे नक्की. माझ्या एवढ्या वेळेच्या ट्रिप्स नंतर कोकणच्या सुंदरते विषयी नक्की काय लिहावे हे देखील मी  अजुन ठरवू शकलो नाही..... आता बोला !!!

गावात आलो की सकाळची सुरुवातच रंगबिरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते, अामराइत बागडणारे पक्षी पाहिले की मन अगदी प्रफुल्लित होवून जाते. त्यात छान चुलीवर गरम करायला ठेवलेले पाणी त्यामुळे वातावरणात भीनलेला धुराचा सुगंध, सकाळच्या धुक्याने पाना-फुलांवर आलेले दव बिंदु, सतेज कांति घेवून बागडणारी टवटवीत फुले. उदबत्तीच्या सुंगंधाने दरवळलेली सकाळी पुजेचा मान मिळवणारी तुळस........ एवढे सगळे वैभव निसर्गाने या कोंकण भूमिला दिले आहे की वर्णन करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील, आणि या वातावरणात चहाचा कप घेवून मी :P :P

बागडणारे काही पाहुणे 

चुल आणि चिर्यांच्या भिंतीवर ओझरणारा धुर

धुक्यात न्याहालेली टवटवीत फुले

आरोग्यदायिनी तुळस

गावचे वातावरण तसे नेहमीच उत्साहित असते. सकाळी सकाळी शेताकडे गुरे घेवून निघालेला बळीराजा, मधेच गावची लाइफ-लाइन असणारी लाल एस्टी, मधेच दिसणारी छोटाली रिक्शॉ आणि  पावसा नंतर पिकायला आलेली हिरवी-पिवळी दिमाखात डोलणारी भात शेती पाहिली की मन अगदी उत्साहित झाल्याशिवाय राहत  नाही .......खरे आहे ना ?

सकाळी गुरे  चरण्यासाठी घेवून जाणारा बळीराजा
हेमंत ऋतू मधे छान डोलणारी हिरवी-पिवळी शेते आणि नयनरम्य नदी

लाइफ-लाइन ST बस आणि छोटुल्या रिक्शॉ 


सासरेबुवा, निवळी धबधब्यासमोर
"काळजात यांच्या भरली शहाळी"
कोंकण म्हंटले की  छान डोंगरदऱ्या, जंगल, हिरवळ हे समीकरण नेहमीचेच आहे, पण यातून ओघळणारा धबधबा (निवळी धबधबा) पहिला की मन किती प्रफुल्लित होते हे शब्दात नाहीं सांगू शकत, आम्ही तर रस्त्यात थांबून फोटो घेतले यावरून अंदाज बांधु शकता :)
जसा हा परिसर निसर्ग संपन्न आहे तसा सांस्कृतिक वारसा जपणारा देखील आहे, कोसुंब पासून काही अंतरावरच मार्लेश्वर देवस्थान ,गणपति पुळे, पावसचा  मठ, पुर्णगढ़, कनकादित्य (सुर्य मंदिर), अडिवरे महाकाली मंदिर तर थोड़े दूर (७० ते ९० कि.मी.) जोतिबा, नरसोबाची वाड़ी, कोल्हापुर महालक्ष्मी अशी नावजलेली मंदिरे  आहेत. माझे भाग्य की या सगळ्या देवस्थानांना माला भेट देता आली. पुढे मालवण परिसरात आलात की वेतोबा, हेदवि गणेश, कुणकेश्वर अशी बरीचशी मंदिर आहेत तर विजय दुर्ग सारखे किल्ले आहेत. म्हणून सर्वगुण संपन्न असा परिसर पाहिला की मुंबई नको होते (थोडया दिवसांकरता :P).
गावची एक खासियत म्हणजे ते तुम्हाला अगदी आपलेसे करून टाकते आणि तिथून निघताना पाय उचलता उचलत नाही हे नक्की………!!!गणपती पुळे मंदिर

कोकणची संध्याकाळ देखील तेवढीच रम्य आणि सुंदर असते, गूगल वर सर्च केलेत तर बरेचसे बीच दिसतील, आम्ही यावेळी भाट्ये बीचवर गेलो होतो. शांत, सुंदर आणि जास्त वर्दळ नसलेला असा हा बीच आहे. बीचवरच रत्नसागर नावाचे रिसोर्ट आहे. आपल्या खोलीत बसून फेसाळलेल्या लाटांचा आनंद लुटायचा असल्यास हे रिसोर्ट तुम्हाला ती संधी देईल :)

रत्नसागर मधुन दिसणारा भाटये समुद्र-किनारा

 आता समुद्र किनारी आलात आणि मासे नाही घेतले असे होणे जरा कठीणच नाही का?तर  असा हा निसर्गरम्य आणि विविधतेने नटलेला कोंकण प्रांत नेहमीच आपल्याला खुणावत राहील ……!!!!

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes