गोष्ट एका यु-टर्नची....

U-Turn ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही गाड़ी घेतली (विकत किंवा भाड्याने) की जोडीला फ्री मधे मिळते बरोबर ना ? ;) माझ्या मते काही अपवाद वगळता खुप कमी लोक असतील जे ही गोष्ट मान्य करणार नाहीत.

माझी U-Turn ची ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे :)

ई. पूर्व २००७ साली माझ्या कंपनीने निर्णय घेतला की मला अमेरिका या देशामधे जावून काम केले पाहिजे. भारतीय लोकांनीच का माझा त्रास सहन करून घ्यायचा अश्या काहिस्या बेताने :P .............. आणि माझी परदेश गमनाची तयारी सुरु झाली. बरेच लोक भेटायला आले आणि माझ्या ट्रॅवेल लिस्टच्या चौपट गोष्टी सांगून गेले. सगळ्यांकडेच मला  द्यायला सल्ला होता आणि सगळेच अमेरिकेत ५-५० वर्ष राहून आले आहेत असे भासत  होते, असो पण त्यांचा हेतु चांगला होता हे नक्की.

ठरल्या प्रमाणे माझे आगमन ह्यूस्टन या शहरात झाले. तेथील मोठाले रस्ते पाहून माला या जन्मात  तरी इथे आपण गाड़ी चालवू  शकत नाही असे  वाटले होते. त्यात मी २ दिवस गाडी  शिकून अमेरिकेत आलो होतो आणि माझ्या मित्राची पाटी तर कोरिच होती.

उलट्या दिशेने रोडवर घातलेली हीच ती - पॉन्टिएक विबे 
अमेरिकेतील माझ्या साहेबांनी आम्हाला गाड़ी चालवायचे थोड़े धड़े दिले आणि गाड़ी भाड्याने घेण्यासाठी परवानगी दिली. मी आणि माझा मित्र दोघेही गाड़ी घेण्यासाठी शनिवारी पोहोचलो. कागदपत्रे पूर्ण केली आणि गाडीच्या किल्ल्या घेवून आम्ही निघालो, गाड़ी चलावण्याचा माझा अनुभव मित्रा पेक्षा मोठा (२ दिवसांनी) म्हणून माझा मान पहिला :). गाड़ी चालू करून सर्विस रोडवर आणली खरी पण U  टर्नची वेगळी लेन असते हे माला चुकीच्या लेन मधे गाड़ी घातल्या नंतर कळले, जेव्हा समोरासमोर गाड्या आल्या हेड लाइट्स लागले, हॉर्न वाजु लागले: P. माझा नशीबावर तेव्हा विश्वास बसला कारण मी ज्या लेन मधे चुकीच्या दिशेने गाड़ी घातली त्या लेन मधे त्या दिशेने कॅमेरा न्हवते आणि मी वाचलो :) :) :) तर असा हा माझा पहिला वहिला U -टर्न इन अमेरिका :).

अमेरिकेत दूसरा आठवडा संपतो ना  संपतो तेवढ्यात आमच्या ग्रीनविलच्या मित्रांनी न्यूयॉर्क - नायगरा ट्रिप करण्याचे ठरवले आणि लास्ट मिनिट प्लान असल्यामुळे तो फायनल देखील झाला आणि अमेरिकेतील पहिल्या ट्रिपसाठी  मी  आणि माझा मित्र तयार झालो :) आठवड्या मधे सुट्टी नसल्या कारणाने शनिवार-रविवार या दोन  दिवसात ट्रिप आटोपायचे ठरले. ट्रिपचा प्लान काहीसा असा होता.

  • शुक्रवारी रात्रीचे विमान पकडून न्यूयॉर्क येथे भेटायचे (रात्रि ११.०० ) -  मी आणि माझा मित्र ह्युस्टन वरुन आणि बाकीचे ६ ग्रीनविल वरुन 
  • रात्रीच कार भाड्याने घेवून नायगरा गाठायचा (पहाटे पहाटे ५.००)
  • नायगरा फिरून संध्याकाळी पुन्हा न्यूयॉर्क साठी निघायचे (सां. ३.०० )
  • न्यूजर्सी येथे मुक्काम करायचा (रात्रि. ८.०० )
  • सकाळी न्यूयॉर्क दर्शन (स. ९.०० पासून)
  • रविवार रात्रिचे परतीचे विमान पकडून घरी (रात्रि ११.०० )
  • सोमवार कामावर हजेरी
ऑफिस मधे शुक्रवार संपला आणि अमेरिकेतील पहिल्या ट्रिपची सुरुवात झाली. आम्ही धावपळ करत जेमतेम विमान सुटायच्या ४० मिनिटे अगोदर पोहचलो आणि वेळेप्रमाणे विमान ५.३० ला जागेवरून निघाले. आमचे नशीब एवढे चांगले की रनवेला काही प्रॉब्लम झाला आणि आमचे विमान रनवे बाहेर २ तास तसेच उभे होते :(. कसबसे रखडत-रखडत आम्ही न्यूयॉर्कच्या JFK इंटरनॅशनल ऐरपोर्टवर उतरलो आणि मित्रांची वाट बघत बसलो. भ्रमणध्वनि (सेलफोन) नसल्याने काहीएक कळायला मार्ग नव्हता, कसाबसा आम्ही पब्लिक फ़ोन वरुन त्यांना कॉल केला आणि कळाले  ते गेट१  ला  वाट बघत आहेत आणि आम्ही गेट४  ला :P. दोन्ही गेटला यायला जायला बस पकड़ावी  लागते :P. असा सगळा गोंधळ करत आम्ही सर्व रात्रि १२.३० च्या सुमारात भेटलो आणि साधारण रात्रि १.३० च्या वेळेला गाड़ी भाड्याने घेवून न्यूयॉर्क वरुन नायागराला जाण्यासाठी निघालो.

रस्ते मोहीम ए नायगरा :)


सगळे गाडीत स्थिरवालो आणि  गाड़ी नायगराच्या दिशेने जावु लागली. न्यूयॉर्कचे रस्ते समजायला थोड़े कठीण  जात  होते आणि आमच्या ट्रिपचा पहिला यु -टर्न झाला. आम्ही त्याच त्याच ठिकाणी गोल गोल फिरत आहोत असे समजतात आम्ही एक २४ तास मेडिकल शॉप मधून मँनहाटनचा (न्यूयॉर्क) नकाशा  घेतला, आणि रात्रि २ च्या सुमारास त्यात डोके टाकून शोधु लागलो. नशिबाने सिटीच्या बाहेर जाण्यासाठी आम्हाला रस्ता समजला आणि आम्ही पुढे निघालो.
रस्ते मोहीम - पाउल खुणा :)

छान ब्रूकलिन ब्रिजवरुन गाड़ी पुढे जात होती आणि रात्रीचा न्यूयॉर्कचा देखावा अगदी अवर्णनीय असा होता. वाटले पुनः पुनः या ठिकाणी यावे. मनतली ही इच्छा माझ्या चालक मित्राला कशी कळाली कुणास ठावुक आणि ३० मिनिटे  फिरून आमी पुनः ब्रूकलिन ब्रिज पाशी आलो :P आणि आमच्या ट्रिपचा दूसरा यु -टर्न झाला. कंटाळून आम्ही एक टॅक्सी थांबवली आणि आमच्या मधील दोघे त्यात बसले आणि सिटीच्या बाहेर नेवुन आम्हाला सोड असे सांगितले, टॅक्सीला फॉलो करत आम्ही सिटीच्या बाहेर येऊन पोहचलो. टॅक्सीचे बिल माला आठवते ते काही ४५ $ झाले होते


न्यूयॉर्क सिटीमधे छान २ तास आणि २ मोठे यु-टर्न घेवून आम्ही एकदाचे नायगराच्या मार्गाला लागलो, त्यात मोठी गाड़ी असल्यामुळे बऱ्याच गोष्ठी कळत नव्हत्या आणि त्यातही वेळ जात होता. मजेची गोष्ट म्हणजे खुप थंडी  होती आणि विंडशील्ड वर येणारे दव बिंदु कसे काढावे हे माहित नसल्याने कपड़ा घेवून हाताने काच साफ़ करत करत आम्ही पुढे जात  होतो. फाइनली कुणालातरी ते बटन सापडले आणि आमची अमेरिकेतील पहिली वहिली ट्रिप आनंदात चालू झाली. पूर्ण रात्र दंगा करत सगळे जण नायगराच्या ओढीने सुखावले, रात्रीचे ३  वाजले असावे.

पूर्ण शांत रस्ता, नायगराची डोळ्यात स्वप्न, पहिली अमेरिकेतील ट्रिप तीसुद्धा जगातील एका नामांकित स्थळी अजुन वेगळे ते काय हवे अश्या विचारत अजुन २ -३ तास कसे सरले कुणालाच कळले नाही. पहाटे पहाटे ६ च्या सुमारास दुरुन काहीसा धूसर बोर्ड दिसू लागला , सगळे खुप उत्सुक होते, जस जशी गाड़ी जवळ जात  होती तस तशी उत्कंठा वाढत होती आणि फाइनली आम्हाला बोर्ड दिसला
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"Welcome  to  New York"

आम्ही पूर्ण न्यूयॉर्कला वळसा घालून दुसऱ्या साइडने न्यूयॉर्कलाच पोहोचलो होतो :)
आज पर्यंतचा यु-टर्नचा जागतिक रेकॉर्ड आम्ही केला होता. :P 
तब्बल ४-५  तास ३००-४०० मैलाचा  प्रवास करून आम्ही पुन्हा  न्यूयॉर्क मधेच येवून ठेपलो होतो.

तर अशीही आमची अमेरिकेतील यु-टर्नची गोष्ट  :)
मोहीम फत्ते - दुपारी ०१.०२ :) - डॉज ड्यूरंगो सोबत
पुढे आम्ही नायगरा गाठले, न्यूयॉर्क पाहिले आणि लाल लाल डोळे घेवून सोमवारी कामावर हजेरी देखील लावली. आमच्यावर कीव येवून साहेबाने आम्हाला लवकर सोडले आणि आमची ट्रिप संपली :)
टीम यु-टर्न @ एम्पायर स्टेट बिल्डिंग 

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes