उन्हाळ्याची सुट्टी - Summer Vacation

दोन  आठवडे देशाच्या बाहेर राहून घरी परतलो आणी नेहमी प्रमाणे विमान उशीराने असल्यामुळे घरी येताना मध्यरात्र झालीच. नेहमी शांत असलेली माझी कॉलनी आज अगदी नवचैतन्य आल्यासारखी भासली, बायकोला विचारले १२ वाजून गेले तरी एवढी पोर खाली कशी ? आणि लगेच उत्तर मिळाले "अरे उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे", नकळत कानावर आलेली "उन्हाळ्याची सुट्टी" मला पूर्ण गतकाळात (Flash  back ) घेवून गेली..........

चातक (एक पक्षी जो फक्त पावसाचेच पाणी पितो) देखील पावसाची जेवढी वाट बघत नसेल तेवढी वाट आम्ही (मी  आणि माझा मित्र-परिवार) या सुट्टीची पहायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीची तयारी अगदी वार्षिक परीक्षेची तयारी चालू झाली की सुरु होई, त्यामधे अगदी पहिल्या दिवसा पासून शेवटच्या दिवसा पर्यंतची पूर्ण आखणी (Planning)  केलेली असे. कधी  एकदा शेवटचा पेपर देतो आणि सुट्टी सुरु होते असे झालेले असायचे. शेवटचा पेपर झाला म्हणजे पहिला उद्योग म्हणजे आमंच्या इथल्या AC टूरिंग टॉकीजला  चित्रपट पाहणे. या चित्रपट गृहात नैसर्गिक AC  असल्यामुळे दिवसाचे फ़क्त दोनच खेळ  होत  असत. सर्वांच्या माहिती साठी हे टूरिंग टॉकीज़ म्हणजे पत्र्याची बाजूला शेड असलेले ओपन टू स्काय थिएटर. सायंकाळी सूर्य मावळला की पहिला शो सुरु होइ आणि जर लाइट गेली तर तेवढा चित्रपट कापला जात असे, जेणेकरून पुढला शो वेळेवर सुरु होऊल :-) परिक्षेनंतरचे दोन खेळ म्हणजे वर्षातून एकदाच हाउस फुलचा बोर्ड लावायची संधी हे समीकरण. गमंत म्हणजे टॉकीज़ला अगदी जत्रेचे स्वरुप आलेले असायचे आणि देशाचे भविष्य टॉकीज़ मधे जाण्यासाठी उतावीळ असायचे :P , त्यात या टॉकीज़ मधली सिटींग अरेंजमेंट अगदी भन्नाट होती ती पुढील प्रमाणे रू. ३ - जमीन , रू. ५ - बाकड़े आणि रू. १० -खुर्ची. मला  अजुनही स्पष्ट आठवते की इयत्ता ७ वीचा शेवटचा पेपर दिला आणि मी "हमाल दे धमाल" पहायला गेलो होतो आणि आईने छान ब्रेडजाम भरून दिला असताना मी तिथला वडापाव चोरून खाल्ला  होता :-) अश्या बऱ्याच आठवणी या टॉकीज़ सोबत जोडलेल्या आहेत......... असो

पुढे दूसरा दिवस म्हणजे उशीराने उठणे, घरच्या कोंबडीने दिलेल्या अंड्याचे ऑमलेट आणि बेकरीच्या ताज्या पावची न्याहारी (ब्रेकफास्ट) करणे आणि सकाळी १० ला टीवी समोर "बालचित्रवाणी" साठी बसणे. उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की "बालचित्रवाणी" हा न चुकता पाहिला गेलेला कार्यक्रम त्यातल्या ओरीगामीच्या बऱ्याच गोष्टी माला अजुनही येतात (उडणारा पक्षी, कमळ, बेडक, ई. ) :-P

काळे जांभूळ
न्याहारी झाली की पुढे दुपारच्या जेवणापर्यंत प्रातःविधी (अंघोळ, पुजा  ई. ई. ) आटोपून पुढल्या इवेंट साठी माझी तयारी झालेली असायची तो इवेंट म्हणजे पत्त्यांचा डाव :-). मी  आणि माझे सर्व मित्र माझ्या घरसमोर असलेल्या मोठया जांभळाच्या झाड़ा खाली जमायचो, सर्वजण घरून  एक चटई आणि उशी घेवून येत असत आणि झाडाखाली आमचे डाव रंगत… ५-३-२, गुलाम चोर, मेंढीकोट, जोडपत्ता ऎसे बरेचसे खेळ खुप गोंगटात अगदी सायंकाळ पर्यंत चालु असत. कंटाळा आलाच तर उशीवर डोके  ठेवून आराम करायचा किंवा छान  जांभळे  वेचुन जीभ जांभळी करायची :P
 संध्याकाळ झाली की घरी आईने चहाबरोबर केलेला फराळ हाणायचा आणि मग "आट्या -पाट्या" चालू होत  असत. "आट्या -पाट्या" हा एक मैदानी खेळ आहे जो दोन गटात (टीम) खेळला जातो. जमिनीवर आखलेल्या १४ घरांवर एका  टीमने अडवायचे आणि दुसऱ्या टीम ने ७ घरे ओलांडून पुन्हा सुरुवतीच्या जागी येणे असा हा खेळ. 
आट्या-पाट्या

आट्या -पाट्या चालू झाल्या की सर्व परिसर अगदी गोंगाटाने भरून जायचा त्यामधला महत्वाचा आवाज म्हणजे "पाणी -पाणी -पाणी" कारण  सात घरे ओलांडून पुन्हा येताना  खेळाडूने हे बोलत येणे अपेक्षित असते, कबड्डी कबड्डी कसे बोलतात तसे काहीसे  :P :P  नंतर कंटाळा आलाच तर आबादुबी (कपड्याच्या चेंडूने  एकमेकांना मारणे), बॅडमिंटन आणि सोबत न संपणार्या गप्पा :-) वरील दिनक्रम हा रोज वेगवेगळा असे कधी क्रिकेट कधी सुर-पारंब्या तर कधी गावताच्या गसड्यांवर उड्या मारत सोन-साखळी असे बरेचसे खेळ सुट्टीत आम्ही खेळायचो, मुख्य गोष्ट विसरलोच ते म्हणजे भाड्याने सायकल चालवणे, १ रुपया अर्धातास या दराने  :-P
करवंद 


रान -आवळे

विलायती चिंच
धामणं
खेळासोबत खाणेदेखील चालू असायचे ते रानमेव्याचे, माझे गाव सफाळे पुर्ण डोंगराने वेढलेले आहे म्हणुन  सुट्टीचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे रानात  जावून करवंद , विलायती चिंचा, धामणं, रान-आवळे, बोर, रांजणं, चीकू  ई. गोष्टींवर मनसोक्त ताव मारणेथोड्याच दिवसात कैऱ्या छान मोठ्या झाल्या की कैरीचे पन्हे बनवण्याचा उद्योग चालु  होइ, सर्व मित्र वर्गणी काढत आणि साखर बर्फ आणि भेळेचे सामान आणून आम्ही रानात भेळ  व  पन्हयाची पार्टी पूर्ण दिवस दंगल करत साजरी करायचो काही  लोक माडाची ताजी माड़ी घेवून येत आणि पार्टी अजूनच रंगून जात  असे :P.

कच्ची कैरी
आमचा जंगलातला अड्डा म्हणजे "पाण्याचे कूप" (जंगलात असलेली पाण्याची जागा) तसेच कधी जास्तच मस्ती आली तर तांदुळवाडीचा किल्ला आम्ही चढून जायचो आणि परतीच्या वाटेवर टाइम बॉम्ब लावत यायचो (अगरबत्तीला सुतळी बॉम्ब बांधून पेटवायची की टाइम बॉम्ब  झाला :-P) 
तांदुळवाडी किल्ला
 आठवड्यातून एकदा आमची फेरी केळवेबीच वर  होत असे, आम्ही सर्व मित्र सायकल  घेवून केळवेबीचवर जायचो (११ किलोमीटर) आणि पूर्ण दिवस समुद्राच्या पाण्यात खेळायचो :). अशी आमची सुट्टी अगदी मजेत आणि धुमाकुळ घालत चालु  असायची ती अगदी पाउस पडेपर्यंत ………… :)


केळवे बीच
Photo Courtesy: Google

हे सर्व आठवले की एकच ओळ म्हणविशी वाटते "लहानपण देगा देवा…………!!!"

तसे  पाहिले तर आतची पीढ़ी ही उन्हाळ्याची सुट्टी विडियो गेम्स, इन डोअर गेम्स, वेगवेगळे क्लासेस यामधे काढते आणि निसर्गापासून दूर राहते, खरोखरच त्यांना हे सुख मिळायला  नको का ??? यावर नक्की विचार करा !!!!आणि जर तुम्हाला तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण झाली असेल तर या पोस्ट वर तुम्ही केलेल्या गोष्टी (उठाठेवी) कमेंट रुपात पोस्ट करा :)

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes