Kokan Shimga....Kokan Holi!!!

होळी..

होळी म्हणले की चटकन अाठवते ती म्हणजे पुरणाची पोळी आणी साहेबाला नको तिथे मारलेली बंदुकिची गोळी. :-)
होळी फक्त पोळी साठीच प्रचलीत नाही बरे का, ती प्रसिद्ध अाहे निरनिराळ्या रंगासाठी, स्पेशल ठंडाईसाठी, अपरात्री मारलेल्या बोंबांसाठी :)
मुंबईकर वर्षानुवर्षे होळी मोजुन दोन दिवसांचीच साजरी करत आला अाहे. आदल्या रात्री होळी दहन आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन. तुमच्या सारखाच मी देखील दोन दिवस होळी साजरा करणारा मुंबईकर अगदी गेल्या वर्षापर्यंत.. आता तुम्ही म्हणाल मग आता कसला शोध लागला ????तर शोध लागला तो कोकणच्या होळीचा. :-)

मला उमजलेली कोकणची होळी पुढे सांगण्याचा प्रयत्न करत अाहे...

अापण नेहमीच शिमगा हा शब्द एेकत आलो अाहोत अाणि त्याचा सोईस्कर अर्थ "फँन्सी ड्रेस" करुन होळी समोेर नाचणे हा अाहे असे समजत अालो आहोत. निदान मला तरी हेच माहित होते. अाई पुढे कुठल्या गोष्टी साठी हट्ट धरला तर अाईचा अोरडा मिळालेला आठवत असेलच सगळ्यांना "उगीच शिमगा करु नकोस" :P

असो...........

चाकरमानी मुंबईकर शिमग्यासाठी कोकण कडे रवाना, सगळ्या एस.टी. गाड्या, रेल्वे, खाजगी वाहानांचे बुकींग फुल.......
अशी बातमी टिविसेट वर झळकली की समजावे की प्रत्येक कोकणी माणुस सुट्या टाकुन शिमग्याला निघाला :-) आता नक्की शिमगा म्हणजे काय ? होळी चे काय? धुलिवंदनाचे काय? रंगपंचमी कुठे राहिली ? असे नानाविध प्रश्न तुमच्या समोर उभे ठाकले असतील... हो ना ??

काळजी करु नका, या सगळया प्रश्नांची सविस्तर माहिती मी पुढे देणार अाहे :)

सर्व प्रथम शिमगा म्हणजे "देव" घरी येण्याचा सण. कोकणा मध्ये फाल्गुन महिन्याच्या  पोर्णिमेला (म्हणजेच होळी पोर्णिमेला) देवळातील देव पालखिमध्हे बसविले जातात आणि देवळा बाहेरिल सानेवर त्यांचे वास्तव्य असते. आता विचाराल "सान" म्हणजे काय? तर देवळा बाहेर बनविवेला कट्टा किंवा पार. पुर्वीच्या काळात शेणामातिने लिंपलेले हे कट्टे अाता सिमेंट चे झाले अाहेत हाच काय तो बदल :)

एकदा काय देव साने वर आले की वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते 
१. नमन /खेळे (देवांना गाण्याच्या माध्यमाने आवाहन - देव जागवणे)
२. दशावतारी नाटके
३. पालखि नाचवणे      
४. भजन किर्तन, ई... 

पालखी नाचवणे 
मुंबईमध्हे जेव्हा होळी दहन होते (पोर्णिमेचया रात्री-१२ वाजता) अाणि लोकं टल्लीन होवुन शिव्यांच्या बोंबां मारत  रंगपंचमीला (धुलिवंदन) सुरुवात करतात तेव्हा कोकणात सर्वजण देवांच्या आगमनाने हर्षित होवुन जयघोष करण्यात तल्लिन असतात. पुढे हे कार्यक्रम छान उशिरा पर्यंत चालु असतात. पारंपारीक वाद्य असल्यामुळे ध्वनी प्रदुषण नाही किंवा पोलिसांचे बंधन नाही, केवळ त्या परमेश्वराशी जुडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.

होळी पोर्णिमा संपली आणि दुसऱ्या दिवशीचा सुर्य उगवला की कोकणात सगळिकडे "होम" लागायला सुरुवात होते.(होम म्हणजेच होळी दहन). प्रत्येक गावातिल "होम" हा वेगवेगळ्या वेळेला लागत असतो. सुदैवाने माझ्या गावचा (कुंभारखाणी) "होम" संध्याकाळी तर माझ्या सासरचा (सांगवे) "होम" सकाळी लागतो आणि माझे भाग्य असे की मला व माझ्या मंडळींना दोंन्ही कडे हजेरी लावणे शक्य होते :). होम किंवा होळी दहनाचा कार्यक्रम देखिल तितकाच रोमांचक असा असतो. माड उभारणे, होेळ देव स्थापना, पालखी नाचवणे, होळी दहन... ई.

होम 

सविस्तर माहिती साठी कृपया ईथे क्लिक करा :)

"होम" लागले की पुढे "शिंपणंचालु होतात. "शिंपणंम्हणजे देव घरी येण्याचा उत्सव. "साने" वर आलेले देव होेम संपले की पालखीतुन गावातिल सगळ्या घरा घरात ढोल ताशाच्या गजरात येतात आणि गावातिल मान्यवरांच्या घरी वस्तीला देखील राहतात. देव घरी येणे म्हणजे किती मोठी भाग्याची गोष्ट आणि हेच भाग्य प्रत्येक कोकणी माणुस दर शिंमग्याच्या निमित्ताने उपभोगत असतो.
देव घरी अाले की त्यांचे खुप अगत्याने स्वागत केले जाते, पुर्ण अंगण शेण‍ा-मातिने शिंपले जाते, रांगोळ्या काल्या जातात, घर छान सजविले जाते आणि देवा बरोबर आलेल्या सर्वांना अल्पोपहार दिला जातो.
घरी आलेल्या देवांचे पुजन केले जाते, खणानारळाने अोटी भरुन घरी बनविलेल्या अन्नाचा नैवेद्य देवांना दाखविला जातो. 

घरात देवांचे (पालखी ) आगमन 

देव पुजन

सविस्तर माहिती साठी कृपया ईथे क्लिक करा :)

पालखि सोबत आलेले गुरव, मानकरी, गावकर मोठ्या भक्तिभावाने देवांना यजमानांच्या वतिने "गाऱ्हाणं" घालतात. घरात सुखसमृद्धि, शांती आणि भरभराट नांदो असा अार्शिवाद देत देव पुन्हा  पालखित बसुन पुढच्या घरी रवाना होतात.
होम लागले की पाचव्या दिवशी गावात रंगपंचमी साजरी केली जाते. गावातिल लोक मोठ्या संखेने एकत्र येतात अाणि गुलाल उधळत, पालखि नाचवत, जयघोष करत रंगपंचमी साजरी करतात.
हे "शिंपणं" अगदी मराठी नववर्ष म्हणजे गुढिपाडव्या पर्यंत चालतात आणि देव पुन्हा आपल्या निवासस्थानी म्हणजे देवळात परतात :)

ईतकी सुंदर होळी मी अजुन पर्यंत पाहिली नव्ह्ती. पर्यावरणाचे नुकसान नाही, अँसिड चे फुगे नाहित किंवा लोकांना कृत्रिम रंगाचे भय नाही, शिव्याशाप नाहित, फक्त असतो तो निखळ आनंद आणि भगवंता सोबत वेळ मिळाल्याचे समाधान......

सगळ्यांचे भले कर रे महाराजा......!!!!   व्हय महाराजा !!!!!! :)

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

No comments:

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes