गुढीपाडवा... एक नविन सुरुवात

गुढी पाड‍वा म्हंणले की आठवते श्रीखंड पुरी :)

लहान पणापासुन एकही गुढीपाडवा वारणाचे श्रीखंड आणि चितळेंचे आम्रखंड या शिवाय गेला नाहि. अजुनही फारसा बदल झालेला नाही ती वेगळी गोष्ट :-P. लहानपणी या गुढिची मला खुप ओढ असायची आणि तेव्हाच ठरवले होते की स्व:ताचे घर झाले की गुढी पाडवा साजरा करायचा आणि सुदैवाने सगळ्या गोष्टि जुळून आल्या आणि गेल्या वर्षी पासुन गुढी पाडवा सप्तनी साजरा करायला लागलो :-)

Gudhi Padwa 2013

गुढी पाडवा ह्या सणाबद्दल बरिचशी माहिती मिळवली आणि मनात आले की हि माहिती सर्वांपर्यंत पोहचायला हवी म्हणुन हा केलेला प्रामाणिक प्रयत्ऩ.

गुढी म्हणजे "ब्रम्हध्वज" जी आपल्याला विश्वातील प्रजापती लहरींचे फायदे मिळवुन देते. हिंदु धर्मामध्ये अशी मान्यता आहे की पुर्ण सृष्टि हि त्रिदेवांनी संचालित आहे. ब्रम्हा-उत्पत्ति, विष्णु-पालन आणि महेश-संहार. या सर्व देवांपासुन निर्मित लहरी सृष्टि संचालित करतात. त्यातली ही ब्रम्हलहरी किंवा प्रजापती लहरी. श्री. ब्रम्हाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे "सत्य-युगाची" सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी विश्वातिल तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधीक संचित करायचा प्रयत्न करतो.

गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाहि तर तो विजयध्वज देखिल आहे. जेव्हा "श्री राम" लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेंव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. एवढेच नाहि तर "राजा शक" याने हंस राजाचा पराभव देखिल पाडव्याच्या दिवशी केला आणि "राजा शालिवाहनाने" शत्रुवर मात करत विजयध्वज फडकविला तो देखिल पाडव्याच्या दिवशीच. म्हणुनच मराठी नववर्ष ओळखले जाते ते "श्री शालिवाहन शके १९४१ प्रारंभ". (06th April,2019). हिंदु कँलेंडर किंवा मराठी कँलेंडर चंद्राच्या दशांवर अवलंबुन असते तर ईंग्रजी कँलेंडर हे सुर्याच्या दशेवर अवलंबुन असते. मराठी कँलेंडर मधली चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा.

गुढीपाडवा म्हणजे काय ते आता सर्वांना कळले आहे, चला आता या ब्रम्हध्वजाचे पुजन कसे करावे हेही समजुन घेवुया.

चित्रात दाखविल्या प्रमाणे गुढी उभारली जाते. गुढीत वापरलेल्या सर्व साधनांचे महत्व चित्रात दिले आहे.
गुढी प्रवेश द्वाराच्या उजव्या बाजुला उभारावी (दाराबाहेर पाहताना आपली उजवी बाजु). आताच्या फ्लँट संस्क्रृतित ते शक्य नसल्यास बालकनी मध्ये देखिल चालेल :-)

गुढी पुजा खालिल प्रमाणे करावी.

१) गुढी उभारण्याची जागा छान स्वच्छ करुन रांगोळी ने स्वस्तिक काढावे. स्वस्तिका मधाेमध हळदि-कुंकू घालावे

२) चित्रात दाखिवल्या प्रमाणे गुढी सजवुन घ्यावी.

३) पुढे स्वस्तिक काढलेल्या जागेवर पाट ठेवावा आणि गुढी उभारुन घ्यावी.

४) पाटावर चित्रात दाखविल्या प्रमाणे पुजा मांडुन घ्यावी.

५) धुप, दिप, अगरबत्ती, कापुर लावुन गुढी पुजन करावे, गुळ-खोबरं काही गोड वस्तुचा नैवेद्य अर्पण करावा.

६) सुर्योदया नंतर ५ ते १० मिनीटात गुढि उभारणे शुभ मानले जाते, तसेच सुर्यास्ता पुर्वी गुढि उतरवणे गरजेचे आहे.

गुढीपुजा झाली की पुढे पाडवा साजरा केला जातो. लग्न झाले असेल तर तो सक्तिने साजरा होतोच. नविन लग्न झाले असेल तर बायकोला सोन्याचा दागिना देणे सर्वमान्य पहिला उपहार आहे :P, तर पुढे निदान जरीची साडी तरी उपहार म्हणुन दिली गेली पाहिजे. वरिल मजकुर हा सर्व स्त्रिवर्गाला आवडणारा असा आहे आणि पुर्ण वर्ष सुख-समाधान आणि शांती साठी गरजेचा आहे :P :P :P.
असो...... महराष्ट्रामधील साडेतीन मुर्हुता पैकी गुढिपाडवा हा एक मुर्हुत गणला जातो आणि या दिवशी कुठल्याही नविन गोष्टीची खरेदी करणे लाभदाई मानले जाते. 

चला तयारीला लागा खरेदिच्या... पुरुषांना " All the Best " आणि स्त्रियांना "Happy Shopping" :)

******   नुतन वर्षाभिनंदन ******
                  

मराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा !!!

1 comment:

Thank you for reading! Do Let us know your views.

INSTAGRAM FEED

@crazyfoodiesontoes