Series:This is what dreams are made off


..त्याचं स्वप्नं

रोहतांग पासच्या रेस्तरौ मध्ये बसलोय.
अचानक ती दिसते..
-१० वर्षांपूर्वी भेटलेली..
अजूनही तशीच..मोहक..
थोडीशी अल्लड..
थोडीशी समजूतदार..
काळजाचा ठाव घेणारं स्मितहास्य...

मी जवळ जाऊन कडकडून मिठी मारतो..
ती पण घट्ट धरते..
पण तिच्या पकडीत ती ओढ नसते..
माझ्या हृदयाचा ठोका चुकतो..

आम्ही कोपऱ्यातल्या टेबलावर बसतो..एकांतात..
ती जरा शांत असते..मी धुंद झालेलो असतो
इतकी वर्षं ..कुठे..काय..कसं..
आज इथे कसा ? तू इथे कशी?

हळूहळू जवळ येतो आम्ही ..
हात हातांत येतात..
ओठांची छोटीशी मोहोर तिच्या मानेवर उठते...
अचानक ती मागे सरते
हात अजूनही माझ्या हातातच असतो..

मी तिच्या डोळ्यात बघतो ..
काहीतरी वेगळेच भासतात ते..
डोळे मला अनोळखी असतात..
त्यांत तो विश्वास नसतो..
काय आहे मग..
कदाचित अपराधीपणाची भावना..?

माझी नजर खाली झुकते
आणि पुन्हा एकदा ठोका चुकतो..
मी डोळे फाडून बघत राहतो..

त्या गळ्यात मंगळसूत्र असते..
 चार क्षणांत माझं भावविश्व पुन्हा उध्वस्त झालेलं असतं .....  तिचं उत्तर
आता तु समजुन घे .................

 स्वप्न मनातली भिती असते , स्वप्न मनातली हुरहूर सुद्धा 
  स्वप्न मनातली आशाही आणि  मनातिल संगीत सुद्धा 
  
 माझ्याविना किती एकटा, किती त्रासलेला
  सांगून गेले  हे स्वप्न मला

 पण  आता मोकळा हो,
 मोकळी कर मनातली भीतीची जागा

 मनात आता तुझ्या प्रेम माझे 
  आता मी फक्त तुझीच, तुझ्याचबरोबर आणि  तुझ्याचसाठी


 परत जावू  त्या थंडीत  परत जावू  त्याच बाकावर
 परत जावू  त्या बर्फात, परत जावू हातात हात धरायला
  पण  यंदा  परत जावू ते एकत्रच 

 हो आणि मंगळसूत्र असेल तुझ्या नावाचं  गळ्यात  माझ्या
  तुझ्या मिठीत मी आणि माझ्या नजरेत प्रेम आणि  विश्वास फक्त तुझ्याकरता !!

Comments

  1. hmm....good
    conclusion:
    for girls: prem, bhavna, vishwas, etc etc
    for guys: there is nothing like 'not available'

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for reading! Do Let us know your views.

Popular posts from this blog

BabyShower or Dohale Jevan Part 1-Customs

Celebrating Baby's First MakarSankranti

Baby Shower or Dohale Jevan Part-2-Games